You are currently viewing कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भव्य नेत्रचिकित्सा व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर..

कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भव्य नेत्रचिकित्सा व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर..

कुडाळ /-

कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भव्य नेत्रचिकित्सा व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.गेल्यावर्षी मार्च महिन्यामध्ये कुडाळ व ओरस येथे शिबिरे आयोजित करून रुग्णांवर मोफत नेत्र चिकित्सा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या दोन्ही शिबिरात जवळपास तीनशे रुग्णाने नेत्रचिकित्सा केली होती व त्यातील 60 रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया पार पडली होती. व सर्वांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती.त्यानंतर लॉक डाऊन लागल्यामुळे रेल्वे बंद झाल्यामुळे काही रुग्णांवर शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. पुन्हा तालुक्‍यात प्रत्येक विभाग वार अशी शिबीर आयोजन करून कुडाळ तालुका मोतीबिंदू विरहित तालुका म्हणून नाव लौकिक करण्याचे तालुका काँग्रेसने ठरविले आहे .याचाच भाग म्हणून पहिल्याप्रथम कुडाळ, तेंडोली व माणगाव या भागांमध्ये ही शिबिरे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले.
कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून मोफत नेत्रचिकित्सा व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर शुक्रवार दिनांक26 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सिद्धिविनायक हॉल कुडाळ रेल्वे टेशन रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नजीक येथे आयोजित केले आहे .या शिबिरात एक्सपर्ट डॉक्टर डोळे तपासणी करून ज्यांच्यावर मोतिबिंदू शस्त्रक्रिया आवश्यक आहे .त्यांच्यावर पुढील आठ दिवसांमध्ये वेळ देऊन मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल .जे कोणी रुग्ण या शिबिरात सहभाग घेऊ इच्छितात ,त्यांनी आपली नावे खालील पदाधिकाऱ्याने मोबाईल नंबर वर कळवावीत. असे आवाहन प्रभारी तालुका अध्यक्ष कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेस यांनी केले आहे.
टीप: १)येताना आधार कार्ड घेऊन येणे.
२) चिपळूण पर्यंत रेल्वे तिकिटाचे पैसे घेऊन येणे
. ३) बँक पासबुक झेरॉक्स.
रेल्वे तिकिटाचे पैसे परत आपल्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहेत. आगाऊ नोंदणी करावी
संपर्क
चिन्मय बांदेकर-९०४९९३३४३९
तबरेज शेख-८०८७०३८८१८

अभिप्राय द्या..