You are currently viewing काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी विल्यम सालढाणा.

काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी विल्यम सालढाणा.

सावंतवाडी /-

काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी चराठा माजी सरपंच विल्यम सालढाणा यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे यांनी ही निवड केली आहे.विल्यम सालढाणा कॅथलिक बँकेचे विद्यमान संचालक असून त्यांनी या बँकेचे व्हाईस चेअरमनपदही भूषविले आहे. तसेच ते अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष आहेत. विल्यम सालढाणा माजगाव विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष असुन त्यांनी काँग्रेस पक्षासाठी दिलेल्या योगदानाची आणि अल्पसंख्यांक समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.विल्यम सालढाणा यांच्या या निवडीबद्दल त्यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, काँग्रेसचे जेष्ठ नेते अँड दिलीप राघू नार्वेकर, जिल्हा प्रवक्ते इशाद शेख, सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, सावंतवाडी शहर अध्यक्ष राघू नार्वेकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..