You are currently viewing एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा.

कुडाळ /-

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप आपल्या मागण्यासाठी गेले आठ दिवसांपासून सुरू असून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथे संपस्थळी भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सोबत आहे. महाविकास आघाडी सरकारने काही प्रमाणात मागण्या मान्य केल्या आहेत.विलीनीकरणाच्या मागणी संदर्भात न्यायालयीन निर्देशानुसार आघाडी सरकारने समिती गठीत केली आहे.त्या समितीचा अहवाल मुदतीत येईल.त्याऺनतर सरकार निर्णय घेईल.त्यामुळे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी थोडा संयम ठेवावा.कुठलाही टोकाचा निर्णय घेऊ नये.आघाडी सरकार तुमच्या सोबत आहे.संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या रास्त आहेत.आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मा अमित सामंत यांच्या माध्यमातून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मा,शरद पवार साहेब.अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री नाम, अजितदादा पवार यांची भेट घेऊन संपाबाबत योग्य तोडगा काढण्यासाठी नक्कीच प्रयत्न करून आपणांस न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करु असे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव मा,काका कुडाळकर यांनी सांगितले.यावेळी जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, तालुका अध्यक्ष शिवाजीराव घोगळे,अल्प संख्याक जिल्हा कार्याध्यक्ष नझीरभाई शेख, तालुका उपाध्यक्ष साबा पाटकर.सहकार सेल जिल्हाध्यक्ष उत्तम सराफदार, जयराम डिगसकर.इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..