वेंगुर्ला /-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा च्या वतीने दिनांक १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत सेवाभावी उपक्रम आयोजित करून सेवा सप्ताह साजरा करण्यात आला.
भाजपा वेंगुर्ले च्या वतीने महीला मोर्चा तर्फे रुग्णालयात फळवाटप , किसान मोर्चा च्या वतीने वृक्षारोपण व वृक्षवाटप, अनु.जाती मोर्चा च्या वतीने दलित वस्तीत स्वच्छता अभियान, शहराच्या वतीने कोवीड सेंटरला वेपोरायझर कीट भेट,युवा मोर्चा च्या वतीने रक्तदान शिबिर, कायदा सेलच्या वतीने मोफत सल्ला उपक्रम इत्यादी सेवाकार्य करुन सेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. सेवा सप्ताहाची सांगता वायंगणी ग्रामपंचायत हद्दीत सागर किनारा स्वच्छता मोहीम घेऊन करण्यात आली. या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या स्वच्छता अभियानामध्ये जिल्हा सरचिटणीस व सेवा सप्ताहाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक,माजी जि. प.सदस्य बाबा राऊत, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता उपाध्यक्ष दिपक नाईक,किसान मोर्चाचे बाळु प्रभु,सोमनाथ टोमके, वायंगणी उपसरपंच हर्षद साळगांवकर, ग्रा.पं.सदस्य सतिश कामत, माजी सरपंच तात्या केळजी, कासव-मित्र सुहास तोरसकर, संतोष तोरसकर, संतोष साळगांवकर, पापलो तोरसकर,अनंत केळजी,प्रसाद पेडणेकर, चंद्रकांत पेडणेकर, बाळा मेस्त्री,सुभाष कांबळी,पंकज साळगांवकर, नारायण साळगांवकर, विजया कांबळी, माया तोरसकर, मिलन कांबळी, स्वप्निल साळगांवकर, सुनील भोगवेकर, आदित्य साळगांवकर, उल्हास साळगांवकर, ध्यानबा तोरसकर,बब्या खोबरेकर, जितेंद्र तोरसकर, मदन खोबरेकर आदी बहुसंख्य ग्रामस्थ या अभियानात सहभागी झाले होते.