कणकवली /-
कणकवली शहरात रविवारी एका तरुणाला कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत सेना नेते यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धडक देत पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांना जाब विचारला.
पोलिसांची ही दंडेलशाही चुकीची असून पोलीस नेमके कोणासाठी काम करताहेत असे संदेश पारकर यांनी सुनावले.
मारहाण ज्या तरुणाला झाली तो भागीरथी प्रजापती म्हणाला की महापुरुष कॉम्प्लेक्स मध्ये माझे दुकान आहे. याठिकाणी आपण आपली तब्बेत ठीक नसल्याने डॉक्टर कडे जाण्यासाठी थांबलो होतो. यावेळी पोलिसांची गाडी आली त्यावेळी येथील उभे असलेले लोक पळून गेले मात्र मला डॉक्टर कडे जायचे असल्याने मी तिथेच थांबलो. मात्र पोलिसांनी मला मारहाण केली. माझ्या पायावर बुटाच्या लाथा मारल्या. असे त्याने सांगितले. भागीरथी याचा पाय सुजला असून त्याला चालताही येत नाही.
दरम्यान पारकर यांच्या आक्रमकतेमुळे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी नरमाईची भूमिका घेत हा विषय इथेच मिटवा अशी विनंती केली मात्र याबाबत आपण वरिष्ठ स्थरावर तक्रार दाखल करणार असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.