गावातील बंद करण्यात आलेल्या एसटी बस फेऱ्या तात्काळ सुरू करा.;हरी खोबरेकर

गावातील बंद करण्यात आलेल्या एसटी बस फेऱ्या तात्काळ सुरू करा.;हरी खोबरेकर

मालवण /-

तालुक्यातील अनलॉक झालेल्या गावातील बंद करण्यात आलेल्या एसटी बसच्या फेर्‍या सुरू करण्यात याव्यात,अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण आगार प्रमुखांकडे केली आहे.याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.त्यात असे म्हटले आहे.की,कोरोनाच्या काळात आधीच लोक मेटाकुटीला आले आहेत.अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी काही सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.त्यासाठी अनलॉक झालेल्या तालुक्यातील गावामध्ये बंद करण्यात आलेल्या बस फेर्‍या तात्काळ सुरू करण्यात याव्यात ,अशी मागणी केली आहे.यावेळी नगरसेवक गणेश कुडाळकर,आनंद चिरमुले,अमित घाडीगावकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..