तुळस उत्सव हाॅटेल ते आजगिणेवाडी रस्ता वाहतुकीस धोकादायक..

तुळस उत्सव हाॅटेल ते आजगिणेवाडी रस्ता वाहतुकीस धोकादायक..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस उत्सव हाॅटेल ते आजगिणेवाडी रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला असून वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याबाबत संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात आली आहे.या रस्त्यावरून आजगीणेवाडी,वाघेरीवाडी,लिंगदाडावाडी गिऱ्याचे गावळ वाडीत जाणारा रस्ता आजगिणेवाडीत खचला आहे. या चारही वाडीतील रहिवाशांची या रस्त्यावरून वर्दळ असते. वाहतुकीचा एकच मार्ग असून दररोज सुमारे १०० गाड्यांची वर्दळ असते. रस्ता वाहतुकीस पूर्णपणे धोकादायक बनला असून जीवित हानी होण्याची शक्यता आहे. सदर रस्तादुरुस्ती तात्काळ करण्यात यावी,अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

अभिप्राय द्या..