मालवण /-

गेले आठ महिने मालवण मधील
मत्स्य व्यवसाय कार्यालयात सहाय्यक-आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार हा रत्नागिरी येथील मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडे सोपविल्यानंतर केवळ महिन्यातून एकाच दिवशी ते मालवणला व्हिजिट देतात त्यामुळे मच्छिमारांची अनेक कामे अडकून राहिली आहेत.

मच्छिमारी हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले आहेत तरीही
अद्याप मच्छिमार बांधवांच्या नव्या नौकांची नोंदणी, बंध नोंदणी, नमुना ५ या व इतर लहान सहन कामे देखील ही कायमस्वरूपी मस्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त नसल्याने प्रलंबित राहिली आहेत

जानेवारी २०२० मध्ये मालवणचे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त पद रिक्त असणाऱ्या पदाचा रत्नागिरी येथील मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडे अतिरिक्त पदभार आहे.
मालवण येथील मस्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त हे पद प्रभारी असल्याने बांधण्यात आलेल्या नव्या बोटींची नोंदणी, नमुना पाच , बंध नोंदणी या सारखी कामे प्रलंबित आहे. नवीन बोटींचे नोंदणी न झाल्याने अनेकांना मासेमारी परवाना मिळणे मुश्कील झाले आहे. याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत आहे
याशिवाय मालवणच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे मच्छिमारांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मालवणात कायमस्वरूपी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त शासनाने नियुक्त करावे
असे लेखी पत्र मत्स्यव्यवसाय कार्यालयात नॅशनल असोसिएशन ऑफ ऑफ फिशरमेनचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी देऊन राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page