आचरा /-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी तर्फे सेवा सप्ताह म्हणून पाळला जात आहे. मालवण तालुका भाजपच्या वतीने चिंदर भगवंतगड येथील ऐतिहासिक भगवंत गड किल्ल्यावर सेवा सप्ताहा निमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कोरोना महामारीत आपल्या जिवाची पर्वा न करता कार्य करणाऱ्या चिंदर बांदिवडे केंद्रातील शिक्षकांचा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. या वेळी त्यांच्या सोबत महिला व बाल कल्याण सभापती सौ बांदेकर, भारतीय जनता पार्टी मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, मालवण सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, विलास हडकर, जिल्हा परिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस,हडी सरपंच महेश मांजरेकर,भाउ सामंत, संतोष गांवकर,प्रकाश मेस्त्री,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत नाईक, दिपक सुर्वे, देवेंद्र हडकर,समिर बांवकर, केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर, नामदेव सावळे यांच्या सह अन्य शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी कोरोना काळात शिक्षकांनी केलेलं काम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आवश्यक असलेली सुसज्ज हास्पिटलची मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्या कडे करुनही सत्ताधारयांनी ती पुर्ण केली नसल्यामुळेच सध्याच्या कोरोना महामारीत जिल्ह्याची अशी बिकट अवस्था झाल्याची त्यांनी सांगितले.सुत्रसंचलन महेश मांजरेकर यांनी तर आभार भाउ सामंत यांनी मानले.