You are currently viewing वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मासिक सभा संपन्न..

वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मासिक सभा संपन्न..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले शिवसेना तालुकाची पदाधिकारी कार्यकर्ते मासिक सभा येथे शिवसेना संपर्क कार्यालयात संपन्न झाली. सदर सभेच्या वेळी आगामी होणाऱ्या नगरपालिका निवडणूक, जि. प., पं. स. निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या विषयावर व महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा करण्यात आली. सदर सभेच्या अनुषंगाने पुढील कालावधीमध्ये जि. प. गटनिहाय बैठका व कार्यकर्ते व शिवसैनिकांशी थेट संवाद पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठका संपन्न होणार आहेत. अशा प्रकारच्या सूचना तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी दिल्या व विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्यासह उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, शहरप्रमुख अजित राऊळ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, उदय गोवेकर, सुधाकर राणे, अण्णा वराडकर,श्रीकांत घाटे, संदिप केळजी, सुहास मेस्त्री, विवेकानंद आरोलकर, सुनिल सादजी, शंकर कुडव, हेमंत मलबारी, उमेश नाईक, मनोहर येरम,शैलेश परुळकर, दिलीप राणे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..