You are currently viewing शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त कुडाळ मालवण मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त कुडाळ मालवण मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन..

कुडाळ /-

शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त बुधवार १७ नोव्हेंबर २०२१ रोजी कुडाळ मालवण मतदारसंघात अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहरात रुग्नांना फळे वाटप तसेच जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. वाडोस येथे रक्त तपासणी शिबीर व रक्तदान शिबीर, अनाव सविता आश्रमासाठी संगणक संच प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कुडाळ शिवसेना शाखा येथे युवासेनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.मालवण शिवसेना शाखेत जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..