You are currently viewing निवती येथील विजय सदाशिव कांबळी यांच्या विरोधात निवती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

निवती येथील विजय सदाशिव कांबळी यांच्या विरोधात निवती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

वेंगुर्ला /-

निवती येथील विजय सदाशिव कांबळी वय वर्षे 46 राहणार निवती मेढा तालुका वेंगुर्ला यांच्या विरोधात निवती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.सदरची तक्रार ही विलास बापू आरोलकर यांनी त्यांच्या मालकीच्या असलेल्या इंटरनेट वाईफायचा जंग्सशन बॉक्स तोडून ,त्यांना शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात आरोलकर यांनी तक्रार दाखल आज १५ नोव्हेंबर रोजी केली आहे.आरोलकर यांना निवती पोलिसांनी आम्ही योग्य ती कारवाई करू तुम्ही काळजी करू नका असे अस्वासन निवती पोलिसांनी आरोलकर यांनां दिले आहे.

सदरच्या इंटरनेट वाईफायचा जंग्सशन बॉक्स तोडल्यामुळे वर्क फॉर्म होम करण्याचे काम हे पूर्णपणे ठप्प झाले आहे.शाळा, कॉलेज करणारे विद्यार्थी वर्क फॉर्म होम करून आपले काम करतात मात्र असे वायफाय तोडल्याने सर्वांचे नुकसान झाले आहे.या वाईफाय जंगशन बॉक्स तोडल्याने आरोलकर यांच्यासह अजून सहा ते सात कुटुंबातीलचे इंटरनेट कनेक्शन हे नादरुस्त झाले आहे.आणी विजय कांबळी यांनी पोलिसात माझी तक्रार केली तर मी पुन्हा कनेक्शन तोडेन अशी धमकी यांनी आरोलकर यांना दिली आहे.

अभिप्राय द्या..