You are currently viewing वेंगुर्ले नगरपरिषदेचे स्वच्छतेचे ब्रँड अॅबेसेडर सुनील नांदोसकर यांचा सत्कार

वेंगुर्ले नगरपरिषदेचे स्वच्छतेचे ब्रँड अॅबेसेडर सुनील नांदोसकर यांचा सत्कार

वेंगुर्ला /-


जे.जे.स्कुल ऑफ आर्ट चे निवृत्त प्राध्यापक व वेंगुर्ले नगरपरिषदेचे स्वच्छतेचे ब्रँड अॅबेसेडर सुनील नांदोसकर यांचा सत्कार भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.भाजपा वेंगुर्ले च्या वतीने कॅम्प येथील त्रिवेणी गार्डन मध्ये दिव्य दिवाळी उत्सवाअंतर्गत तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी समारोपाच्या दिवशी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सुनील नांदोसकर यांनी सेवेत असताना दिल्ली येथील संचलनासाठी महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ बनवला,तसेच वेंगुर्ले नगरपरिषदेचे कलादालनातल्या प्रतिकृती,नगरपरिषदेचा सिंबाॅल ,मच्छिमार्केट व क्राॅफर्ट मार्केट मधील रेखाचित्रे,वेंगुर्ल्याच्या प्रवेश द्वाराचे डिझाईन तसेच नगरपरिषदेच्या सभागृहातील वेंगुर्लेची शिल्पकृती इत्यादी कामे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली.त्यामुळे वेंगुर्लेच्या सौंदर्यात भर पडली, म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपा च्या वतीने सत्कार करण्यात आला.या सत्कार प्रसंगी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर ,जि.का.का.सदस्य वसंत तांडेल ,मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, नगरसेवक प्रशांत आपटे, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, पी.के.कुबल, खर्डेकर महाविद्यालयाचे संजय पाटील, सद्गगुरु संगीत विद्यालय सावंतवाडीचे निलेश मेस्त्री, कात्रे सर व निवेदक काका सावंत उपस्थित होते.

अभिप्राय द्या..