You are currently viewing चिकन, फ्रोजन फिशची मुंबई गोव्यातील व्हरायटी आता कणकवलीत उपलब्ध पॉलसी सी फूड्स अँड चिकन स्टोअर खवय्यांच्या सेवेत दाखल..

चिकन, फ्रोजन फिशची मुंबई गोव्यातील व्हरायटी आता कणकवलीत उपलब्ध पॉलसी सी फूड्स अँड चिकन स्टोअर खवय्यांच्या सेवेत दाखल..

समुद्रातील फ्रेश मासे मिळणार 365 दिवस..

कणकवली/-

मत्स्याहारी आणि चिकन खवय्यांसाठी आता 365 दिवस फ्रेश सिफूडस सह चिकन ची व्हरायटी अपूर्व फर्नांडिस यांनी ” पॉलसी ” या आपल्या सी फूड्स अँड चिकन स्टोअर च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली असून या नाविन्यपूर्ण स्टोअर चे उदघाटन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा नगरसेवक अबीद नाईक, नगरसेविका मेघा गांगण, ए. डि. फर्नांडिस, मँगडेलीन फर्नांडिस, डॉ. लिमये, जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, रो.संतोष कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्ष नलावडे म्हणाले की, अपूर्व फर्नांडिस यांनी कणकवलीतील चवीने मासे खाणाऱ्या मच्छीप्रेमींची ताजे मासे उपलब्ध करून मोठी सोय निर्माण केली आहे. सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा स्टोअर ग्राहकांच्या सेवेत असल्यामुळे अचानक पाहुणे घरी आले तरी त्याना ताज्या माशांचा पाहुणचार घालता येऊ शकतो. यावेळी बोलताना ” पॉलसी ” फूड्स अँड चिकन स्टोअर चे अपूर्व फर्नांडिस म्हणाले की सिंधुदुर्गातील पहिला स्टोअर कणकवलीत सुरू ग्राहकांच्या आवडीचे ताजे मासे, चिकन आणि मुंबई गोव्यात मिळणारे अत्यंत हायजीन असणारे फ्रोजन सिफूडस व चिकन ग्राहकांच्या गरजेनुसार उपलब्ध असतील. नगावर मासे खरेदी करण्यापेक्षा किलो दराने ग्राहकांना मासे खरेदी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरते. पॉलसी स्टोअर मध्ये सुरमई,पापलेट, बांगडा, रावस, सौंदाळे, बोंबील, हलवा, चणाक, कर्ली, तांबोशी ,खेकडा आदीसह विविध प्रकारचे ताजे आणि स्वच्छ मासे खवय्यांच्या पसंतीनुसार खरेदी करता येतील. फ्रोजन फिशमध्ये सुरमई, पापलेट, बांगडा, हलवा, कोळंबी तसेच रेडी टू ईट मध्ये चिकन बर्गर, चिकन कटलेट आदी पॅकेटबंद व्हरायटी उपलब्ध असणार आहे. उदघाटनानंतर मासे आणि चिकन खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. यावेळी व्यापारी बाबू वळंजू, वायडब्ल्यूए चे अध्यक्ष तेजस घाडीगांवकर, कृषी अधिकारी शिवाजी खरात, पत्रकार विजय गावकर, डी. डी. कदम, विवेक ताम्हणकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..