You are currently viewing देवगड जामसंडे नगरपंचायत आरक्षण जाहीर…

देवगड जामसंडे नगरपंचायत आरक्षण जाहीर…

देवगड /-

देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सन २०२१ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग/, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला/ व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरता सोडत काढणे ,प्रभाग रचनेचे प्रारूप, करण्याचा कार्यक्रमशुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय जामसंडे येथे पार पडणार आहे.आरक्षण सोडत दि.१२ नोव्हेंबर,स.११ वा. प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करण्याचा दिनांक शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी (हरकती व सूचना मुख्याधिकारी नगरपरिषद /नगरपंचायत यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित विभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर कराव्यात). हरकती सादर करण्याचा कालावधी शुक्रवार दिनांक १२नोव्हेंबर मंगळवार दिनांक १६नोव्हेंबर २०२१दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. हरकती व सूचना करणाऱ्या नागरिकांना सुनावणी करीत उपस्थित जाण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल अशी माहिती प्रभारी मुख्याधिकारी श्री. मारुती कांबळे यांनी जाहीर केली आहे.

अभिप्राय द्या..