You are currently viewing महान नेत्यांचे विचार आजच्या पिढीने कृतीतून जिवंत ठेवावे.;उमेश गाळवणकर.

महान नेत्यांचे विचार आजच्या पिढीने कृतीतून जिवंत ठेवावे.;उमेश गाळवणकर.

कुडाळ /-

“महान नेत्यांचे विचार आजच्या पिढीने आपल्या कृतीतून जिवंत ठेवले पाहिजे. “मरावे परी कीर्तिरूपे” या उक्तीप्रमाणे शेवटपर्यंत ज्यांनी आपला जीवनाचा प्रत्येक क्षण समाजासाठी खर्च केला. व आपल्या मृत्युपश्चात आपला देह मेडिकल संशोधनासाठी दान केला . कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकण विकासाची मुहूर्तमेढ रोवली. अशी महान विभूति म्हणजे मधु दंडवते होय.”असे उद्गार उमेश गाळवणकर यांनी काढले ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये मधु दंडवते यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या प्रा.मधू दंडवते यांच्या व्यक्तिमत्त्वाची उपस्थितीतांना ओळख करून दिली. त्यांच्या उत्तुंग, तत्वनिष्ठ, निस्पृह, प्रामाणिक, सदाचारी कार्यकर्तृत्वामुळेच ते आज जनसामान्यांमध्ये मानाचे व आदराचे स्थान मिळवून आहेत .असे सांगत आपले समाजाप्रती असलेले देणे ओळखून समाजपयोगी काम करत राहिले पाहिजे. असे मानून ज्यांनी समाजकारणाचे एक हुकमी साधन म्हणून राजकारणाकडे पाहिले ते प्रा.मधू दंडवते होत.अशा महान नेत्यांच्या जयंती- पुण्यतिथी यातून त्यांचे विचार ताजे व्हावेत ;त्याचे तरुण पिढीने अनुकरण करावे. या उद्देशाने आपण विविध महान व्यक्तींच्या जयंती-पुण्यतिथी साजरी करतो. असे सांगत उमेश गाळवणकर यांनी मधु दंडवते यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मधु दंडवते यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व पुष्प अर्पण करण्यात आली. यावेळी बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे यांनी सुद्धा प्रा मधू दंडवते यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उपस्थितांसमोर उलगडून दाखविले व त्यांच्या साधी राहणी उच्च विचारांचे विविध दाखले दिले. या पुण्यतिथीचे औचित्य साधून कुडाळ रेल्वे स्थानक व सावंतवाडी रेल्वे स्थानकांमध्ये असलेल्या मधू दंडवते यांच्या प्रतिमेला बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी कुडाळ रेल्वे स्टेशन मास्तर प्रकाश सांगेलकर, मनोहर सावंत, उमेशचंद्र रासम, व्ही. आर .सावंत, गणपत दळवी, संतोष कुमार, सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे स्टेशन मास्तर सौ प्रतीक्षा गावकर, श्री. अनिल आवळेगावकर, संजय पुरळकर ,शिवप्रसाद पेडणेकर, श्री अनिल परब,व्ही. एच. सावंत हे उपस्थित होते तर बॅ.नाट्य पै शिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमातील विविध प्राचार्य ,प्राध्यापक , शिक्षक ,कर्मचारी वृंद उपस्थित होते.

अभिप्राय द्या..