You are currently viewing आरोस दांडेली जय हनुमान मित्रमंडळ आयोजन स्पर्धेत पूजा राणे ठरली मिस दीपावली २०२१

आरोस दांडेली जय हनुमान मित्रमंडळ आयोजन स्पर्धेत पूजा राणे ठरली मिस दीपावली २०२१

सावंतवाडी /-

आरोस दांडेली येथील सौंदर्य स्पर्धेत पुजा राणे हिने मिस दीपावली 2021 मुकुट पटकावला.आरोस दांडेली येथील जय हनुमान मित्र मंडळाकडून दिवाळी निमित्त दिपावली शो टाईम 2021 ह्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे खास आकर्षण असलेल्या मिस दीपावली या सौंदर्य स्पर्धेला रसिकांनी भरभरून दाद दिली. या स्पर्धेसाठी रुचिरा राऊत, सोनल माणगावकर, अदिती मुळीक, पुजा राणे, ममता पेडणेकर, अनुश्री नाईक, नंदिनी बिले, दीपिक्षा माणगावकर, तन्वी गोसावी या एकूण नऊ सौंदर्यवतीनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा एकूण तीन फेऱ्यांमध्ये घेण्यात आली.पहिली फेरी पारंपारिक फेरी होती. यात प्रत्येक स्पर्धकाने भारतीय संस्कृतीला साजेसा असा पेहराव करत स्पर्धकाने आपली ओळख करून दिली. तर दुसरी फेरी ही वेस्टन फेरी होती. यात स्पर्धकांनी वेस्टन वेशभूषा करून आपल्यातील असलेली कला सादर केली. तिसरी फेरी अर्थातच परीक्षा केली. या फेरीत परीक्षकांनी स्पर्धकांना एकापेक्षा एक असे प्रश्न विचारतात स्पर्धकांच्या ज्ञानाची कसोटी घेतली. मात्र प्रत्येक स्पर्धकाने परीक्षकांच्या प्रश्नाना समर्पक उत्तरे दिली. गुलाबी थंडी, सुमधुर संगीत, रसिकांची मोठी उपस्थिती यामुळें उत्तरोत्तर रंगत चालली. पहील्या फेरीपासून अग्रेसर असलेल्या पुजा राणे हिने मिस दीपावली 2021 या सौदर्य स्पर्धेत प्रथम विजेता होण्याचा मान पटकावत मानाचा मुकुट आपल्या शिरपेचात रोवला. तर दुसरा क्रमांक तन्वी गोसावी व तृतीय क्रमांक नंदिनी बिले यांनी पटकावला. उत्कृष्ट केशरचना करिता रूचिरा राऊत तर बेस्ट स्माईल करिता दिपिक्षा माणगावकर यांची निवड करण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह व मानाचा बेल्ट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन हेमंत मराठे यांनी केले. तर परीक्षक म्हणून कमलेश ठाकूर, मधुरा काणे व योगेन्द्र राऊत यांनी काम पाहिले.

अभिप्राय द्या..