You are currently viewing राजन तेली यांना खा.विनायक राऊत यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही.;यशवंत परब

राजन तेली यांना खा.विनायक राऊत यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही.;यशवंत परब

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले न.प.साठी शिवसेनेच्या माजी पालकमंत्री दिपक केसरकर,विद्यमान पालकमंत्री उदय सामंत यांनी २०१४ ते २०२१ पर्यंत दिलेला निधी खासदार विनायक राऊत यांच्या आदेशान्वये आलेला निधी आहे.याची पूर्ण माहिती राजन तेली यांनी घ्यावी व नंतरच खासदार विनायक राऊत यांच्यावर वक्तव्य करावे,असे वेंगुर्ले येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी सांगितले.वेंगुर्ले येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली होती.त्यावर शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब बोलत होते.यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर,शहरप्रमुख अजित राऊळ,उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी,सुनिल डुबळे,शहर समनवयक विवेकानंद आरोलकर,युवा विभागप्रमुख मितेश परब,युवा शहरप्रमुख सुयोग चेंदवणकर,दिलीप राणे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना बाळू परब म्हणाले की,खासदार विनायक राऊत हे २ वेळा खासदार म्हणून निवडून आले असून शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी विकासात्मक निधी सुरुच आहे.तर सावंतवाडी मतदारसंघातून आमदार दिपक केसरकर यांनी २ वेळा धूळ चारलेल्या व माजी आमदार म्हणून मिरवणाऱ्या आमदार राजन तेली यांना खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही.तसेच आजपर्यंत विविध हेडच्या माध्यमातून अग्निसुरक्षा अभियान साठी,नागरी दलितवस्ती पाणीपुरवठा, महाराष्ट्र स्वर्णजयंती नगरोत्थान अभियान,आमदार निधी,पर्यटन निधी,वेंगुर्ले निशाण तलावाची उंची वाढविणे,वैशिष्ट्यपूर्ण निधी मधुसूदन कालेलकर सभागृहसाठी, भाजीमार्केट,मच्छीमार्केट वगैरेसाठी निधी कुठून आला याचे भान ठेवूनच राजन तेली यांनी वक्त्यव्य करावे.वेंगुर्ले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेनेच निधी दिला असून रस्त्यांची कामे काही कालावधीतच पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार पूर्ण होतील,असेही ते म्हणाले.

अभिप्राय द्या..