You are currently viewing प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचा कणकवली येथील युवा मित्रमंडळातर्फे सत्कार.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचा कणकवली येथील युवा मित्रमंडळातर्फे सत्कार.

कोरोना काळात केलेल्या वैद्यकीय सेवेचा केला गौरव..

कणकवली /-

राज्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असताना सारा आरोग्य विभाग या कोरोनाच्या विषाणूवर मात करण्यासाठी झटून कामाला लागला होता. दररोज रुग्णांची आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता हे आरोग्यदूत रात्रंदिवस झटत होते. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचेही या कोरोना काळातील कार्य दखल घेण्यासारखेच होते. त्यामुळे डॉ. पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कणकवली येथील युवा मित्रमंडळातर्फे त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ऍड. अग्निवेश तावडे, गिरीश उपरकर, अखिल रगजी, निखिल जाधव आदी उपस्थित होते.

ऐन कोरोनाच्या काळात डॉ. पाटील यांच्यावर येऊन पडेलेला जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा भार त्यांनी योग्यरीत्या हाताळून कोरोनाच्या काळात जिल्ह्यावासीयांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे प्रकर्षाने लक्ष दिले. त्यामुळे जिल्हा कोरोनाच्या संकटापासून बाहेर पडू शकला. डॉ. पाटील यांच्या या प्रामाणिक कार्याचे कौतुक करण्यासाठी कणकवली येथील युवकांतर्फे डॉ. पाटील यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

अभिप्राय द्या..