कुडाळ /

शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कामगार कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संपाला मनसेने महाराष्ट्रात पाठिंबा दिला आहे. मनसेचे नेते मा. बाळा नांदगावकर यांनी पत्र लिहून महाराष्ट्र सैनिकांना संपात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. मनसे एसटी कामगार सेनेचे बनी नाडकर्णी नेहमीच कामगारांच्या प्रश्नांसाठी लढत असतात , त्यांचे प्रश्न लावून धरत असतात त्यांनी नेहमीच एसटी कामगारांच्या पाठीशी राहण्याचा काम सिंधुदुर्गात केलेले आहे.
मनसे पक्षाध्यक्ष राज साहेब यांनी सर्वात प्रथम मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कामगारांच्या वेदना मांडल्या होत्या. गेली दहा वर्षे सेनेकडे परिवहन खाते आहे. त्यांनी कधीच कामगारांच्या विचार केला नाही. महामंडळ डबघाईला आणले, शिवशाही या खाजगी गाड्या शिवसेनेचे पाप आहे. महामंडळ डबघाईला आणण्यामागे या राज्यकर्त्यांचा मोठा हात आहे .कर्मचार्‍यांचे शोषण करून आपले पोट भरण्यासाठी धाकदपटशाई, निलंबनाची भाषा आज परिवहन मंत्री करताहेत.
खाजगी गाड्या वापरायच्या विचारात सरकार असेल तर राज साहेबांच्या आदेशाने मनसे प्रसंगी कायदा हातात घेईल . हे प्रशासनाने ध्यानात घ्यावे .
आज परिवहन कामगारांची परिस्थिती न घरका ना घाट का अशी आहे. 10 ते 15 तुटपुज्या पगारावर 15_20 तास काम कर्मचारी करित आहेत, आणि कत्रांटी कामगार म्हणून टांगती तलवार माने वर आहेच …. अशा अन्यायकारक निर्णयांमुळे कर्मचार्यारी आत्महत्येसारख्या विचारा पर्यंत पोहोचत आहेत.. पण राजक्त्यांना त्याचे काही नाही ..
जनतेने परिवहन कामगारांच्या भावना समजाव्यात. लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल कामगारांना देखील संवेदना आहेत. पण विलीनीकरणाचा लढा हा महत्त्वाचा लढा आहे ,नाहीतर हे लबाड लांडगे सर्व विकून खातील.. आज तुम्ही कामगार म्हणून एका छताखाली आलात फार बर वाटल. तुमची एकी हिच तुमची ताकद आहे. ती एकी तोडु नका. असे विचार व्यक्त करून मनसे सिंधुदुर्ग सदैव कामगारांच्या पाठीशी आहे, असे मत जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी कुडाळ डेपो येथे संपात सहभागी होऊन व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page