You are currently viewing शैक्षणिक कार्यात सगळ्यांनी एकत्र यावे – जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचे आवाहन.;मठ केंद्रशाळा वेंगुर्ला नूतन वास्तू भूमिपूजन..

शैक्षणिक कार्यात सगळ्यांनी एकत्र यावे – जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचे आवाहन.;मठ केंद्रशाळा वेंगुर्ला नूतन वास्तू भूमिपूजन..

वेंगुर्ला /-

११५ वर्षाची परंपरा असलेल्या कै. रामजी धोंडजी खानोलकर जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. १ च्या नूतन वास्तूचे भूमिपूजन जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, सुनील डूबळे, मठ सरपंच तुळशीदास ठाकूर, शिवसेना उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, सचिन देसाई, या शाळेसाठी जमीन देणारे श्रीकृष्ण खानोलकर, उपसरपंच निलेश नाईक, माजी उपसभापती दीपाली गावडे, राजू गुरव, माजी सरपंच प्रसाद नाईक, किशोर पोतदार, माजी उपसरपंच नित्यानंद शेणई, शिक्षक चिंदरकर, तांबे, ग्रा. पं. सदस्या ययाती नाईक, उत्तम मोबारकर, सेवानिवृत्त केंद्र मुख्याध्यापक विद्याधर कडुलकर, युवा उद्योजक दीपक ठाकूर, रमेश कडुलकर, वैभवी पोतदार, विठ्ठल नाईक, राघोबा ठाकूर, विनोद शेणई, सुरेश मराठे, रामदास खानोलकर, प्रकाश घोलेकर, संतोष नांदोसकर, अशोक मेस्त्री, मनोहर बोवलेकर, दिलीप प्रभूखानोलकर, उपाध्यक्षा सुशीला नांदोसकर, संजना तेंडोलकर, श्रीकृष्ण नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. ही शाळा सन १९०५ साली ब्रिटीश काळात शिक्षणाचे महत्व ओळखुन मठ गावचे सुपुत्र डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांनी मठसारख्या एका खेडेगावात शाळा सुरू केली. या शाळेच्या नूतन इमारतीसाठी सतीश सावंत यांनी प्रयत्न करून मंजुरी मिळवून दिली. त्याचे आज भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

अभिप्राय द्या..