You are currently viewing तळवडे येथे एटीएम फोडीचा प्रयत्न अयशस्वी..

तळवडे येथे एटीएम फोडीचा प्रयत्न अयशस्वी..

सावंतवाडी /-

तळवडे येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञाताकडून फोडण्यात आले आहे. मात्र एटीएम फोडीचा हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. हा प्रकार आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. दरम्यान याबाबतची माहिती स्थानिकांनी संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तर याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली असून पोलीस त्याठिकाणी रवाना झाले आहेत.

अज्ञाताकडून संबंधित एटीएम मधील मशीन फोडण्यात आले आहे. हा प्रकार मध्यरात्री घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. यावेळी घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद, पोलीस बाबू तेली, ग्रामपंचायत सदस्य मंगलदास पेडणेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..