You are currently viewing शिवसेना जिल्हा वाळू संघटनेच्या अध्यक्षपदी बबन शिंदे यांची निवड.;तर सुशील चिंदरकर आणि गणेश तोंडवळकर यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ.

शिवसेना जिल्हा वाळू संघटनेच्या अध्यक्षपदी बबन शिंदे यांची निवड.;तर सुशील चिंदरकर आणि गणेश तोंडवळकर यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ.

सिंधुदुर्ग /-

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा वाळू संघटनेची स्थापना करण्यात आली असून या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून कुडाळ येथील शिवसेनेचे युवा नेते सुशिल चिंदरकर आणि तोंडवळी येथील गणेश तोंडवळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आमदार वैभव नाईक आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली.

संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक आणि शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक सचिन काळप, युवासेनेचे चेतन पडते, सचिव सदा पाटील, खजिनदार आबा खोत, शिवसेना आडवली विभागप्रमुख समीर लब्दे, बाळा पावसकर महादेव पावसकर, अमोल वस्त, आशिष मयेकर, कवठी सरपंच रूपेश वाडयेकर, मंगेश बांदेकर, एकनाथ बांदेकर, खोबरेकर, निलेश खोत, नरेंद्र धुरी, पराग खोत, स्वप्रिल मिठबावकर, संतोष पाटील, बंड्या खोत, मंदार खडपकर, सुनील माळकर, संजय कांबळी, श्रीपाद तेली. अविनाश बळी आदी वाळू व्यावसायिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..