You are currently viewing महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा सकारात्मक विचार व्हावा.;लसाकम जिल्हाध्यक्ष सुभाष साबळे.

महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा सकारात्मक विचार व्हावा.;लसाकम जिल्हाध्यक्ष सुभाष साबळे.

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे लसाकम वतीने निवेदन. ओरोस दि.८ नोव्हेंबर रोजी लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ शाखा-सिंधुदुर्ग वतीने उपजिल्हाधिकारी मा. श्री. रविंद्र मठपती.यांना विविध मागण्यांचे निवेदन देत कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करावे,२००५ नंतरच्या सर्व राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, DCPS अशंदायी पेन्शन योजनेच्या कपातीचा हिशोब संबंधित कर्मचाऱ्यांना त्वरित मिळावा, सर्वच राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन हे CMP प्रणालीद्वारे दरमहा१ तारीखेला होणे अपेक्षित आहे.NCPS पेन्शन योजना तात्काळ बंद करावी. या मागण्यांचे निवेदन देताना लसाकमचे पदाधिकारी व अनेक एसटी बस कर्मचारी उपस्थितीत होते.

अभिप्राय द्या..