You are currently viewing नगराध्यक्ष संजू परब यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भेट देत जाहीर दिला पाठिंबा..

नगराध्यक्ष संजू परब यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भेट देत जाहीर दिला पाठिंबा..

सावंतवाडी /-

विविध मागण्यांसाठी सावंतवाडी एस.टी. आगाराच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनास सावंतवाडी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी भेट देत आंदोलनास भाजपच्या वतीने पूर्ण पाठिंबा दर्शविला.

सर्वसामान्य जनतेसाठी सेवा देणारा एस.टी. कर्मचारी तुटपुंजा पगारावर काम करीत असून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांनी पुकारलेला संप हा रास्तच आहे. शासन सेवेत सामावून घेण्यासाठी एस.टी. कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सावंतवाडीत सुरु आहे. या आंदोलनास नगराध्यक्ष संजू परब यांनी भेट देत जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी परब यांनी एस.टी. कर्मऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन चर्चा केली. ते म्हणाले, एवढ्या कमी पगारात महाराष्ट्रातील हजारो कर्मचारी काम करतात. त्याला दाद दिली पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी 2015 सालापासून आहे. मात्र, अद्यापही ती मान्य झाली नाही हे दुर्दैव आहे. त्यांची मागणी मान्य झालीच पाहिजे. अनिल परब यांचे मी स्टेटमेंट वाचले होते. सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल तर गप्प बसणार नाही. नगराध्यक्ष म्हणून याचा निषेध करतो, असे परब यांनी स्पष्ट केले.

अभिप्राय द्या..