You are currently viewing बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या प्रश्ना संबंधी भाजपचे उपोषण व जनआंदोलन सुरू……

बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या प्रश्ना संबंधी भाजपचे उपोषण व जनआंदोलन सुरू……

दोडामार्ग-

बांदा दोडामार्ग आयी आणि दोडामार्ग विजघर रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत वारंवार आंदोलने करूनही संबधित अधिकारी, ठेकेदार,आमदार खासदार यांच्याकडून आश्वासनापलीकडे काही झाले नाही.याविरोधात रस्त्याच्या कामाबाबत कार्यवाही व्हावी यासाठी दोडामार्ग भाजपच्या पदाधिकाऱ्यानी आज दोडामार्ग गांधीचौक येथे जन आंदोलन व उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणाला स्थानिक जनतेचाही उस्फुर्त प्रतिसाद लाभत असून जोपर्यंत ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला आहे.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण गवस,पंचायत समिती सदस्य लक्ष्मण उर्फ बाळा नाईक,भाजपयुमो जिल्हा उपाध्यक्ष चेतन चव्हाण,युवा सामाजिक कार्यकर्ते शैलेश दळवी,रंगनाथ गवस,विठोबा पालयेकर,राजेंद्र निंबाळकर, सुनील गवस,प्रवीण गवस,नितीन मणेरीकर,मायकल लोबो,सूर्यनारायण गवस,राजेश फुलारी,संजय सातर्डेकर यांच्यासह नागरिक सहभागी झाले आहेत.

अभिप्राय द्या..