You are currently viewing कुडाळत निलेश राणे यांचा एसटी कर्मचाऱ्यांना शब्द.; कसलीही अडचण आली तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासोबत आहोत

कुडाळत निलेश राणे यांचा एसटी कर्मचाऱ्यांना शब्द.; कसलीही अडचण आली तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासोबत आहोत

कुडाळ /-

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सध्या भडकले आहे. राज्यातील २२५ पैकी २२० आगारातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ आगारातील कर्मचारी देखील धरणे आंदोलनाला बसले आहेत. माजी खासदार आणि भाजपचे सचिव निलेश राणे यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना धीर दिला.

नियमित वेतन, सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता आदी मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. नियमित पगार नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची प्रचंड आर्थिक ओढाताण होत आहे. यालाच कंटाळून कित्येक कर्मचाऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. इतकी भीषण परिस्थिती असतानाही राज्य सरकार या कर्मचाऱ्यांकडे ढुंकून पाहायला तयार नाही. कर्मचाऱ्यांना आणि एसटी महामंडळाला दिलासा देण्याऐवजी संप चिरडून टाकण्याचा पवित्रा सरकारमधील घटकांनी घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोषाची भावना आहे. त्यामुळे संप चिघळण्याच्या स्थितीत आहे.

आज कुडाळ स्थानकाबाहेर निदर्शने करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. जिल्हा परिषदेचे गटनेते रणजित देसाई,सभापती नुतून आईर,जिल्हा चिटणीस बंड्या सावंत,जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर,तालुका अध्यक्ष विनायक राणे,ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल,कुडाळ माजी नगराध्यक्ष ओंकार तेली,कुडळाचे भाजपचे शहराध्यक्ष राकेश कांदे ,युवा मोर्चा ता अध्यक्ष रुपेश कानडे,पप्या तवटे,युवा मोर्चाचे सुश्मित बांबूळकर,देवेन सामंत,राजेश पडते,पंचायत समितीचे सदस्य संदेश नाईक,राजन जाधव,स्वप्ना वारंग,तसेच बशीर शेख,तेंडोली सरपंच मंगेश प्रभू,बाव सरपंच नागेश परब,बांबुळी वसंत तेली,तेरसे बाँबर्डे संतोष डीचोलोकर,अंदुर्ला उपसरपंच,वसोली ग्रामपंचायत सदस्य चाळके आदींचा या पदाधिकाऱ्यांमध्ये समावेश होता. या पदाधिकाऱ्यांकडे एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पदाधिकाऱ्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे निलेश राणे यांच्याशी बोलणे करून दिले.

दूरध्वनीवरून संवाद साधताना निलेश राणे म्हणाले, सरकार तुमचे खच्चीकरण करीत आहे. मात्र आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. कधीही कसलीही गरज पडली तर आम्हाला सांगा, आम्ही मदतीसाठी तत्पर आहोत. कोर्ट, कचेरी संदर्भात कसली अडचण आली तरी संपर्क साधा, आम्ही शक्य ती सगळी मदत करू, असे निलेश राणे यांनी स्पष्ट केले. आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांची सर्व ती व्यवस्था पाहण्याचे तसेच त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. निलेश राणे यांच्या या भूमिकेबद्दल एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.त्यावेळी एस.टी कामगार दिनेश शिरवलकर,राजेंद्र वांजरे,रोशन तेंडुलकर,गणेश कुंभार,निलेश शिरोडकर,गुरुनाथ वालावकर,दीपक भोगले यांच्यासह शेकडो कामगार उपस्थित होते.

अभिप्राय द्या..