You are currently viewing दुहेरी महिलांचा खून प्रकरणाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची भेट..

दुहेरी महिलांचा खून प्रकरणाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची भेट..

सावंतवाडी /-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची भेट घेण्यात आली. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी उभाबाजार येथील २ वृद्ध महिलांचा खून प्रकरणाच्या तपासाबाबत पोलीस निरीक्षकांना विचारणा केली. खुन प्रकरणाला ७ दिवस उलटल्यानंतर देखील खुन्याच शोध न लागल्यानं पोलिस निरीक्षकांची भेट घेतली. ‌
तर दुहेरी हत्याकांडासह मळगाव खून प्रकरण, सबनिसवाडा खून प्रकरणातील खुन्यांचाही शोध घेत त्यांना कैद करण्याची मागणी केली. कोणत्याही प्रकारचा दबावाला बळी न पडता खुन्यांचा शोध घेत कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून केली. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व व्यापार दर्शना बाबर-देसाई, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, हिदायतुल्ला खान, याकुब शेख, बावतीस फर्नांडिस, जहिरा ख्वाजा, सावली पाटकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..