You are currently viewing सिंधुदुर्गात एसटी कर्मचाऱ्यांचा १००% टक्के बंद.;एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल..

सिंधुदुर्गात एसटी कर्मचाऱ्यांचा १००% टक्के बंद.;एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल..

सिंधुदुर्ग /-

दिवाळी सुरु होण्यापूर्वी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पेटलेली ठिणगी अद्याप शांत झालेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने संघटनेननी आक्रमक भूमिका घेत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून सिंधुदुर्गातही एसटी कर्मचाऱ्यांनी संपात उडी घेत चक्काजाम आंदोलन हाती घेतले आहे. सर्वच आगारांमधून एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या असून यामुळे प्रवाशांचे बेहाल झाले आहेत. सर्वच बसस्थानकात कर्मचारी जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, वेंगुर्लेसह सर्वच आगारासह सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी ९ वाजल्यापासूनच सरकारविरोधात घोषणा देत संपाला पाठींबा देत उत्स्फूर्त सहभाग दर्शविला आहे.

अभिप्राय द्या..