You are currently viewing वागदेत ट्रक – डंपर चा अपघात.;दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान जीवितहानी नाही..

वागदेत ट्रक – डंपर चा अपघात.;दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान जीवितहानी नाही..

कणकवली /-


कणकवली ते असरोंडी मार्गाने जात असणाऱ्या ट्रक व डंपर चा ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात झाला. ओव्हरटेक करत असताना डंपर व ट्रक एकमेकांना घासून डिव्हायडर क्रॉस करत महामार्गाच्या दुसऱ्या लेन वर येऊन थांबले. या अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात सोमवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास वागदे हॉटेल रेड चिली जवळ घडला. अपघातानंतर वागदे ग्रामस्थांसह वाहतूक पोलिस एस. के. कदम, ए. जे. भुतेलो, एस. एस. करवंजे, व्ही. जि. देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगाने कुडाळ च्या दिशेने जाणारे ट्रक व डंपर ओव्हरेटेक करत असताना एकमेकांना घासले. व त्याच वेगाने ते महामार्गाच्या कणकवली कडे वाहने येणाऱ्या लेन वर येऊन थांबले. सुदैवाने या लेन वरून कणकवलीच्या दिशेने त्याच वेळी वाहने येत नसल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी काही वेळातच अपघातस्थळी धाव घेत दोन्ही वाहने महामार्गावरून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

अभिप्राय द्या..