You are currently viewing वळीवडे येथील मोटर सायकलची चोरी अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल..

वळीवडे येथील मोटर सायकलची चोरी अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल..

देवगड /-

देवगड वळीवंडे पोखरबाव येथील जयसिंग अनंत सावंत वय वर्ष ६६ रा. वळीवडे पोखरबाव यांच्या बंद घराचे अज्ञात इसमाने कुलूप तोडून घरामधील असलेली मोटर सायकलची चावी घेऊन घराबाहेर असलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस ही मोटारसायकल अज्ञात इसमाने चोरी केली असुन सदरची घटना ही १ नोव्हेंबर सकाळी ९ ते ३ नोव्हेंबर सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

वळीवडे पोखरबाव येथील जयसिंग सावंत त्यांचे राहते घर आहे ते काही कामानिमित्त मुंबईला गेले होते ते 3नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ना वंळीवडे पोखरबाव येथे आले असता आपल्या घराच्या समोरील दरवाजाचे कुलूप सोडून घरामधील बेडरूममधील अज्ञात इसमाने प्रवेश करून बेडरूममधील असलेले कपाटा मधील कपडे विसकटून व त्याच्या बाजूला असलेल्या भिंतीवरती मोटर सायकलची चावी घेऊन घराच्या बाहेरील बाजूला असलेली हिरो होंडा कंपनीची एम. एच. ०५ एडी ५२५६ ही मोटर सायकल चोरून नेली आहे सदरची घटना ही १नोव्हेंबर सकाळी ९ ते ३नोव्हबर सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबतची फिर्याद जयसिंग सावंत यांनी देवगड पोलीस ठाण्याला दिली असून देवगड पोलिसांनी सदर घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करून अज्ञात ईसमा विरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस करीत आहे.

अभिप्राय द्या..