You are currently viewing नीट परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या श्रृती मधुकरचे समीर नलावडे यांनी केला गौरव..

नीट परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या श्रृती मधुकरचे समीर नलावडे यांनी केला गौरव..

कणकवली /-

कणकवली शिवाजीनगर येथे राहणारी श्रुती मोहन मधुकर हिने नीट परिक्षेत ६०० गुण मिळवून उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. ऑल इंडिया रँकमध्येही ती आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अव्वल असल्याची माहिती तिचे वडील मोहन मधुकर यांनी दिली. श्रुतीचे वडील कणकवली रेल्वे स्टेशन येथे स्टेशनमास्तर आहेत. श्रुती हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण वरवडे येथील सेंट उर्सुला स्कूलमध्ये झाली. त्यानंतर ती कोल्हापूर येथे पुढील शिक्षणासाठी गेली आहे. नीटमधील यशामुळे श्रुती हिचा महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे. श्रुतीच्या यशाबद्दल कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक संजय कामतेकर यांनीही श्रुतीचे खास अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..