You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा पंचायतराज समितीचा दौरा निश्चित.;२८ पासून येणार पंचायत राज समिती..

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा पंचायतराज समितीचा दौरा निश्चित.;२८ पासून येणार पंचायत राज समिती..

ओरोस /-

महाराष्ट्र विधी मंडळाच्या पंचायती राज समितीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २०१५-१६ व २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनार्वलोकन अहवाल आणि २९१६-१७ व २०१७-१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या संदर्भात भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर सर्व संबंधित अधिकारी यांची साक्ष २८ ते ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०१५-१६ व २०१६-१७ च्या लेखा पुनर्विलोकन परिच्छेदाच्या माहिती बाबतच्या प्रति तसेच २०१६-१७ व २०१७-२८ च्या वार्षिक प्रशासन अहवालावरील प्रश्नावली क्रमांक १ व २ नुसार प्रश्न-उत्तरे स्वरूपात तयार करून त्याच्या पाच प्रतीत माहिती सचिवालयाकडे पाठवावी, असे आदेश महाराष्ट्र विधानमंडळ उपसचिव विलास आठवले यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला दिले आहेत.दरम्यान, पंचायत राज समितीचा दौरा निश्चित झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाची धडधड वाढली असून समितीच्या सामोरे जाण्यासाठी लागणाऱ्या पूर्वतायरीला सुरुवात झाली आहे.

अभिप्राय द्या..