You are currently viewing दोडामार्ग पंचायत समितीच्या इमारतीस तांत्रिक मंजुरी: प. समिती सदस्य बाबुराव धुरी यांची माहिती..

दोडामार्ग पंचायत समितीच्या इमारतीस तांत्रिक मंजुरी: प. समिती सदस्य बाबुराव धुरी यांची माहिती..

दोडामार्ग /-

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेली, दोडामार्ग तालुक्यातील बहुचर्चित पंचायत समितीची इमारत होण्याच्या मार्गावर असून या इमारतीच्या तांत्रिक मंजुरीला मान्यता मिळाली आहे, लवकरच साधारण पावणे चार कोटींपेक्षा जास्त रुपये खर्चून हि इमारत होणार असल्याचे जिल्हा नियोजन समिती व प समिती सदस्य बाबुराव धुरी यांनी प्रेसनोट द्वारे सांगितले आहे.
ते पुढे म्हणाले, दोडामार्ग पंचायत समिती गेली अनेक वर्षे भाड्याच्या इमारतीतून कामकाज हाकत आहे, मात्र आता त्यांची स्वतःची हक्काची इमारत होणार आहे यासंबधात तांत्रिक मंजुरी मिळाली आहे तशा आशयाचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे.तर या इमारतीचा खर्च अर्थसंकल्प वितरण प्रणाली अर्थात BDS प्रणालीद्वारे वितरित होणार आहे.

अभिप्राय द्या..