You are currently viewing चार तासांनी करुळ घाटात वाहतूक कोंडी‌ सुटली; करुळ घाटातील वाहतूक झाली पूर्ववत सुरू..

चार तासांनी करुळ घाटात वाहतूक कोंडी‌ सुटली; करुळ घाटातील वाहतूक झाली पूर्ववत सुरू..

वैभववाडी /-

करुळ घाटातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. प्रवासी वाहनांसह अवजड वाहतूक घाटमार्गाने मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे सध्या घाटमार्गावरील रस्त्यांवर असलेले खड्डे चुकवण्यासाठी चाललेला वाहन चालकांचा प्रयत्न वारंवार करुळ घाटातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे.

आज सायंकाळी ३.३० वाजल्या पासून करुळ घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी चा प्रश्न उपस्थित झाला होता तब्बल चार तासांनी करुळ घाटातील वाहतूक पुन्हा पुर्ववत करण्यात पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. करुळ घाटातील वाहतूक लक्षात घेता लवकरच घाट रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालक व प्रवाशांकडून केली जात आहे.

अभिप्राय द्या..