कुडाळ /-
राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे कोकण विभागीय अध्यक्ष किरण शिकारे याचं युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी ऍड.हितेश कुडाळकर यांनी कोकण दौऱ्यावर असताना कुडाळ शहरात स्वागत केलं आहे.आणि यादरम्यान जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी चर्चा केली आहे. यावेळी ऍड हितेश कुडाळकर यांच्यासोबत युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संदीप राणे, आदी उपस्थित होते.