You are currently viewing वैभववाडीत १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत भरणार दिवाळी बाजार.

वैभववाडीत १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत भरणार दिवाळी बाजार.

वैभववाडी /-

वैभववाडी बाजारपेठत पंचायत समिती व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. ०१ नोव्हेंबर ते ०३ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी बाजारचे आयोजन करण्यात आले आहे.

या दिवाळी बाजारचे उद्घाटन सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वा. पर्यंत हा बाजार वैभववाडी येथील एसटी स्टँड शेजारच्या जुन्या रेस्ट हाऊस परिसरात भरविला जाणार आहे. या बाजारात महिला बचत गटांनी  बनवलेले विविध खाद्यपदार्थ व दिवाळी उत्सवात लागणाऱ्या वस्तू सहज उपलब्ध होणार आहेत. तरी या बाजाराला वैभववाडी तालुक्यातील नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..