वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यात आज विविध प्रकल्प मंजूर केले आहेत.आडेली गावच्या विकासासाठी आज रस्ते विकास च्या बाबतीत तसेच अन्य सुविधांसाठी कटिबद्ध असल्याची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी आडेली भटवाडी येथे दिली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या आडेली भटवाडी ते शंभूभवानी रस्त्याचे भूमिपूजन आज रविवारी माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते झाले.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे,माजी सभापती तथा पं. स.सदस्य सुनिल मोरजकर, शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ,आडेली सरपंचा प्राजक्ता मुंडये,उपसरपंच संतोष कासले,देवा कांबळी, माजी सरपंच प्रकाश गडेकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गडेकर, शिवसेना पदाधिकारी सचिन गडेकर,ग्रा.पं.सदस्य घन :श्याम नाईक,लीलाधर मांजरेकर, रामचंद्र आडेलकर,ग्रामसेवक अनिल चव्हाण,भारत धरणे,नितीन मांजरेकर,तुषार कांबळी,प्रशांत मुंडये आदी उपस्थित होते.तसेच यावेळी उमेश नाईक,प्रविण गडेकर, गंगाधर गोवेकर, पुरुषोत्तम धरणे,मारुती वाघे,नारायण कासले,बाबल कानडे, रामा कोंडसकर,परशुराम वाघे, गौरव धुरी,ठाकूर,गौरव धुरी,राजन दुतोंडकर, दामोदर धुरी,अक्षय दुतोंडकर,अजित मार्गी,दिपक दुतोंडकर,रामचंद्र धुरी,सुरज सोनसुरकर, गणपत म्हारव, मोहन धुरी,सुनिल सोनसुरकर, दिनेश बिडिये, भारत कोंडसकर,मंदाकिनी परब,अशोक गावडे, संदिप कांबळी, रोहित कोंडसकर आदींसह बहुसंख्य महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page