You are currently viewing कुडाळ आर एस ऐन हॉटेल समोर कार मोटारसायकलस्वार यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोघे जण गंभीर जखमी..

कुडाळ आर एस ऐन हॉटेल समोर कार मोटारसायकलस्वार यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोघे जण गंभीर जखमी..

कुडाळ /-

कुडाळ आर एस ऐन हॉटेल समोर येथील महामार्गावर मोटारसायकल व कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होत झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकल वरील लक्ष्मीवाडी येथील सिध्दार्थ काळप (वय-27) व निवजे येथील नील जाधव (वय-13) हे मामा भाचे गंभीर जखमी झाले असुन त्यांना अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताचे सीसीटीव्हिी फुटेज ही पोलिसांना मिळाले अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

अभिप्राय द्या..