You are currently viewing मालवण शहरात जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या विविध विकासकामांची भूमिपूजने संपन्न..

मालवण शहरात जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या विविध विकासकामांची भूमिपूजने संपन्न..

मालवण /-

मालवण शहरात जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या विविध विकासकामांची भूमिपूजन खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

जिल्हा नियोजन मधून मालवण शहराला मंजूर झालेल्या तीन कोटी निधी पैकी पावणे दोन कोटी निधीतून शहरात विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. यामध्ये मालवण नगरपालिका इमारत परिसर आणि बलोद्यान विकसित करणे, नगरपरिषद हद्दीतील वायरी तारकर्ली रस्ता ते गांवकरवाडा ते श्रीपाद पाणंद जोड रास्ता तयार करणे आणि रस्ता मजबुतीकरण व काँक्रीटीकरण करणे, वायरी गर्देरोड परब घर ते मोंडकर रस्त्यास गटार व आधारभिंत बांधणे, भरड येथील जागेत वाहनतळ (पे अँड पार्क व्यवस्था) विकसित करणे, धुरीवाडा बागायतकर घर ते गारुडेश्वर मंदिरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, हॉटेल सायबा समोरील कोळंब खाडी लगतचा परिसर विकसित व सुशोभीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे.

या विकासकामांचे भूमिपूजन रविवारी दुपारी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, जि.प. गटनेते नागेंद्र परब, तालुकप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, नितीन वाळके, महिला तालुका संघटक पूनम चव्हाण, , नगरसेविका सेजल परब, शिला गिरकर, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, भाई कासवकर, संमेश परब, किरण वाळके, तपस्वी मयेकर, किसन मांजरेकर, उमेश मांजरेकर, नंदू गवंडी, गौरव वेर्लेकर, आदी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..