You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली नगरसेवक अबिद नाईक यांच्या घरी सदिच्छा भेट..

राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली नगरसेवक अबिद नाईक यांच्या घरी सदिच्छा भेट..

कणकवली /

सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या पडत्या काळात अनेक आमिषे येत असतानाही राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांशी प्रामाणिक राहत सिंधुदुर्गात राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे सिंधुदुर्गातील नेते अबिद नाईक यांची एकनिष्ठता राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांना ज्ञात आहे. म्हणूनच सिंधुदुर्गात दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते अबिद नाईक कुटुंबीयांची भेट घेतल्याशिवाय जात नाहीत याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री नाम.जयंत पाटील यांनी वेळात वेळ काढून अबिद नाईक यांच्या निवासस्थानी भेट दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी कणकवलीत दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस नेते, नगरसेवक अबिद नाईक यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. बिझी शेड्युलमध्ये असतानाही जयंत पाटील यांनी वेळात वेळ काढून अबीद नाईक यांच्या घरी भेट देत तेथे काही मिनिटे त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा देखील केली. कणकवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर जयंत पाटील यांच्या गाड्यांचा ताफा कणकवली पटवर्धन चौका कडून बाजारपेठेतून ढालकाठी मार्गे अबीद नाईक यांच्या थेट घरी पोहोचला. याठिकाणी अबीद नाईक व कुटुंबीयांनी जयंत पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी अबिद नाईक यांचे वडील अब्दुल नाईक, आई हवाबी नाईक, आसिफ नाईक, अनिस नाईक, हमेरा नाईक, नजमा नाईक, इतरा नाईक, रिझा नाईक, महेक नाईक, अली नाईक व राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..