कुडाळ /-

कुडाळ शहरामधून गुरे घेऊन जाणारा कंटेनर स्थानिक नागरिकांनी पकडला आणि ही गुरे घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकासहित क्लीनरला चोप दिला. यावेळी नागरिक संतप्त झाले होते पोलिसांनी घटनास्थळी येऊन संत राऊळ महाराज महाविद्यालय जवळ पडलेली गाडी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले आणि पोलीस ठाण्यांमध्ये संतप्त झालेल्या नागरिकांनी कंटेनरचे दरवाजे उघडून आतील गुरे पोलिसांना दाखवली यामध्ये संबंधितांवर कारवाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.

नेरुर परिसरातून गुरांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जाते याबाबत नागरिकांना संशय होता आणि त्या संशयाच्या अनुषंगाने काही नागरिक अशी गुरांची वाहतूक करणाऱ्यांवर पाळतीवर होते मात्र ते हाती लागत नव्हते दरम्यान आज नेरुरमधून निघालेला कंटेनर शहरातून जात असताना भाजपचे अविनाश पराडकर यांनी पाहिला आणि त्या कंटेनरची पाठलाग करून हा कंटेनर संत राऊळ महाराज महाविद्यालय जवळ पकडला त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक गोळा झाले आणि कंटेनर चालक व क्लीनरला कंटेनर उघडण्यास सांगितले मात्र कंटेनर उघडण्यास चालक क्लिनरने नकार दिल्यानंतर त्यांना चोप देण्यात आला चोप दिल्यानंतर संतप्त नागरिकांनी यातील मुख्य सूत्रधाराला आणावे अशी मागणी केली दरम्यान याठिकाणी पोलिस दाखल झाले पोलिसांनी याबाबत कारवाई केली जाईल असे सांगून हा कंटेनर ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणला पोलीस ठाणे येथे आणल्यानंतर नागरिकांनी कंटेनर उघडण्याची विनंती केली मात्र पोलिसांकडून नकार देण्यात आल्यानंतर , संतप्त झालेल्या नागरिकांनी कंटेनर उघडला आणि आतमध्ये जनावरे असल्याचे दिसून आले पोलिसांनाही याबाबत सांगितले त्यानंतर पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले दरम्यान पोलिस ठाण्याचा परिसर जय श्रीरामचा जयघोष दुमदुमला होता यावेळी भाजपचे अतुल काळसेकर, राजू राऊळ, बंड्या सावंत, शिवप्रेमीचे रमाकांत नाईक, दैवेश रेडकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, प्रसाद नातू, विजय कांबळी, गणेश भोगटे आदी उपस्थित होते दरम्यान अविनाश पराडकर यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page