You are currently viewing जिल्हा बँक संचालक प्रज्ञा परब यांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते<br>राष्ट्रवादीत काँग्रेसमद्धे प्रवेश

जिल्हा बँक संचालक प्रज्ञा परब यांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते
राष्ट्रवादीत काँग्रेसमद्धे प्रवेश

कुडाळ /-

जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालिका प्रज्ञा परब यांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आगामी काळात होवू घातलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्याचा हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. दरम्यान सो. परब यांचे पाटील यांनी स्वागत केले. तसेच तुमचा पक्षात यथोचित सन्मान केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या प्रवेशा बाबतची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दोन दिवसापुर्वी जाहीर केली होती. तर जिल्ह्यात दौऱ्यावर आलेल्या श्री. पाटील यांच्या उपस्थितीत सो. परब यांना पक्षात प्रवेश देण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, काका कुडाळकर, एम के गावडे, अनंत पिळणकर, अबिद नाईक, अर्चना घारे, पुंडलिक दळवी, प्रफुल्ल सुद्रीक, हर्षद बेग, दर्शना देसाई, सावली पाटकर, उदय भोसले, सुरेश गवस, शफीक खान, हार्दिक शिगले आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..