You are currently viewing जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते कणकवलीत राष्ट्रवादीकाँग्रेस कार्यालयाचे थाटात उद्घाटन…

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते कणकवलीत राष्ट्रवादीकाँग्रेस कार्यालयाचे थाटात उद्घाटन…

कणकवली /-

पुढील दोन तीन महिन्यात नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्‍या जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच सज्‍जता ठेवावी. राष्‍ट्रवादी काँग्रेस प्रत्‍येक बुथपर्यंत पोचावी यासाठी जनतेचे प्रश्‍न समजावून घ्या आणि ते सोडविण्यासाठी प्रयत्‍न करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे केले.

कणकवली शहरातील एस एम हायस्कुल जवळ मुद्रा कमर्शियल हब बिल्डींग मध्ये राष्ट्रवादीच्या कणकवली तालुका कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान कणकवलीत आल्यानंतर श्री. पाटील यांचे ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी या उद्घाटनानंतर बोलताना श्री जयंत पाटील म्हणाले, या कार्यालयाचा उपयोग हा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झाला पाहिजे या दृष्टीने काम करा. या कार्यालयाच्या माध्यमातून कणकवली तालुक्याच्या जनतेचे प्रश्न ऐकणे, सोडवणे व त्याचा पाठपुरावा करणे या दृष्टीने काम लवकरच सुरू झाले पाहिजे. कणकवली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक बूथ पर्यंत पोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असे आवाहन देखील श्री. पाटील यांनी याप्रसंगी केले. यावेळी आमदार शेखर निकम,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्रवादी युवती सेल च्या प्रदेशाध्यक्ष सुक्षणा सलगर, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, तालुका निरीक्षक काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, राष्ट्रवादी नेते नगरसेवक अभिजीत नाईक, जिल्हा बँक संचालक आर टी मर्गज, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, मालवण तालुकाध्यक्ष विश्वास साठे, निखिल गोवेकर,युवक शहराध्यक्ष संदेश मयेकर, युवक विधानसभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, विनोद मर्गज, प्रफुल्ल सुद्रीक, विलास गावकर, अभिनंदन मालडकर, राजेश पताडे, श्रीकृष्ण ढेकणे, सुधा कर्ले, वैभव सावंत, आदी उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान जयंत पाटील यांच्या स्वागताच्या वेळी सिंधू गर्जना ढोल पथकाने केलेल्या स्वागताने जयंत पाटील भारावून गेले.

अभिप्राय द्या..