You are currently viewing मोटरसायकल – बोलेरो पिकअप अपघातात युवक ठार.

मोटरसायकल – बोलेरो पिकअप अपघातात युवक ठार.

मालवण /-

मालवण येथून शुक्रवारी सकाळी चौके नेरुरपार मार्गे बेळगाव-खानापूर येथे स्प्लेडंर मोटरसायकलने (KA-22-HD 4060) जाणाऱ्या युवकाने चौके नारायणवाडी पेट्रोल पंपा शेजारी असणाऱ्या वळणावर कुडाळहून मालवण च्या दिशेने येणाऱ्या मासेवहातूक करणाऱ्या बोलेरो पिकअप ला ड्रायव्हर साईला जोरदार धडक दिली. या अपघातात रस्त्यावर पडून डोक्याला जोरदार मार लागल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला.

मालवण येथे गवडी कामानिमीत्त असणारा अशोक धुळू जंगले (२३, मुळ रा. बेळगांव खानापूर) हा युवक शुक्रवारी सकाळी मालवण वरुन स्प्लेंडर मोटरसायकलने चौके नेरुरपार मार्गे बेळगांव येथे जात असताना सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चौके नारायणवाडी पेट्रोल पंपानजीकच्या वळणावर कुडाळवरुन मालवण ला मासे वाहतूक करणाऱ्या चालक संदिप देसाई यांच्या ताब्यातील बोलेरो पिक अप (MH 07-AJ 2247) ला चालकाच्या बाजूने मागील बाँडीला जोरदार धडक दिली. रस्त्यावर पडून डोक्यात हेल्मेट असूनही जोरदार मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची खबर मिळताच चौके येथील व्यावसाईक संतोष गावडे, बी. जी. गावडे, संजय गावडे, हेमंत गावडे, शिवाजी गावडे, अमित चव्हाण, अजीत गावडे यानी अपघातस्थळी धाव घेतली. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजुला जवळपास एकतास वाहतुक खोळंबली होती. मालवण पोलिस ठाणेचे सहा. पो. निरीक्षक नितीन नरळे, पोलिस काँ. डी. व्ही. जानकर, एच. व्ही. पेडणेकर, व्ही. एच. पाटिल यांनी पंचनामा करुन अधिक तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी चौके आरोग्य केंद्रंत नेण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..