सिंधुदुर्ग /-
नोव्हेंबर 2005 नंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली अंशदायी आणि नंतरची राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून पूर्वीप्रमाणेच पेन्शन योजना सुरू करावी यासाठी आज कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. राज्यभर छेडण्यात आलेल्या या ठिय्या आंदोलनात राजपत्रित अधिकारीही सहभागी झाले आहेत.आज कणकवली येथील पिडब्ल्यूडी कार्यालयासमोर सकाळच्या सत्रात तासभर ठिय्या आंदोलन केले. पेन्शन आमच्या हक्काची …नाही कोणाच्या बापाची, कोण म्हणतो देणार नाही…घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देत जुन्या पेन्शनची मागणी केली. या आंदोलनात कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, उपकार्यकारी अभियंता श्रीमती प्रभू, सर्व शाखा अभियंता, अधिकारी, लिपिक, चालक संघटनेचे जिल्हा पदाधिकारी शैलेश कांबळे, शिपाई प्रवर्गातील कर्मचारी सहभागी झाले होते.