You are currently viewing जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत वेंगुर्ले प.स.समोर छेडले आंदोलन…

जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत वेंगुर्ले प.स.समोर छेडले आंदोलन…

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला राष्ट्रीय पेन्शन योजना (एन पी एस) रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा सिंधुदुर्ग – शाखा वेंगुर्लाच्या वतीने वेंगुर्ले पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा वेंगुर्लाचे अध्यक्ष गणेश बागायतकर,
तालुका उपाध्यक्ष अनिल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, कृषी विस्तार अधिकारी संदेश परब, पालकरवाडी ग्रामसेवक व्ही. जी. सावंत, केळुस ग्रामसेवक विवेक वजराटकर, परबवाडा ग्रामसेवक प्रवीण नेमण, मोचेमाड ग्रामसेवक पी. ए. गर्कल, तुळस ग्रामसेवक डी. एस. चव्हाण, उभादांडा ग्रामसेवक अरुण जाधव, वेतोरे ग्रामसेवक भूषण चव्हाण, अणसुर ग्रामसेवक काळसेकर आदी उपस्थित होते. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, एन. पी. एस. रद्द करा – रद्द करा, हमारी युनियन हमारी ताकद, एकच मिशन जुनी पेन्शन, हम सब एक है आदी घोषणा देण्यात आल्या.

अभिप्राय द्या..