You are currently viewing राज्यस्तरीय इंग्रजी निबंध स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेली दिपिका खोबरेकर हिचा भाजपच्या वतीने सत्कार

राज्यस्तरीय इंग्रजी निबंध स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेली दिपिका खोबरेकर हिचा भाजपच्या वतीने सत्कार

वेंगुर्ला /-


विश्व मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय इंग्रजी निबंध स्पर्धेत संपूर्ण राज्यातील ८९५७ स्पर्धकामधून प्रथम क्रमांक मिळवलेली शिरोडा केरवाडी येथील कु.दिपिका राकेश खोबरेकर हिचा तिच्या निवासस्थानी तिचे वडील राकेश खोबरेकर व तिची आई विदयमान शिरोडा ग्रामपंचायत सदस्य रोहिणी खोबरेकर यांच्या उपस्थितीत भाजपचे रेडी जि.प.सदस्य, माजी आरोग्य,शिक्षण,सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ,भेट वस्तू देऊन भाजप तालुक्याच्यावतीने सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हयाच्या वतीने मान्यवर म्हणून जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,सरचिटणीस बाबली वायंगणकर,उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,शिरोडा सरपंच मनोज उगवेकर,शिरोडा ग्रामपंचायत सदस्य समृद्धी धानजी,रेडी शिरोडा आरवली सागरतीर्थ शक्ती केंद्र प्रमुख जगन्नाथ राणे,विदयाधर धानजी,महादेव नाईक,विजय बागकर,भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत,शिरोडा शहर ज्येष्ठ पदाधिकारी सीताराम उर्फ बबन आडारकर,मनोहर होडावडेकर ,हरिश्चंद्र परब,अनिल गावडे,चंद्रशेखर गोडकर,रेडी भाजप ज्येष्ठ पदाधिकारी अरुण राणे,भाजप शिरोडा शहर पदाधिकारी बूथ अध्यक्ष जयानंद शिरोडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी यांनी केले.

अभिप्राय द्या..