सिंधुदुर्ग /-


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये कार्यरत असणाऱ्या पत्रकारांनी मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत इलेक्ट्रॉनिक मिडिया मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्गची दोन वर्षा पुर्वी स्थापना करण्यात आली होती.सदर स्थापना झाल्यानंतर अधिकृत नोंदणीसाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे या बाबत अर्ज दाखल करण्यात आला होता.त्यअनुषंगाने सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी उपरोक्त संस्थेत अधिकृत नोंदणी क्रमांक:- F -0005181(SDD) हे प्रमाणपत्र जारी केले असून ते प्रमाणपत्र श्री.कृष्णा उर्फ आबा खवणेकर यांना प्रदान करण्यात आले आहे.

इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून युट्यूब,सोशल मिडिया, वेब,प्रिंट मिडीया आदींचा यात समावेश केला असून,या क्षेत्रातील पत्रकारांच्या समस्या,अडचणी,न्याय,हक्क आदी गोष्टी बाबत सरकार दरबारी वाचा फोडण्यासाठी व या क्षेत्रातील पत्रकारांची एकजूट राहण्यासाठी या संघाची स्थापना झाली असून आगामी काळात या संघाच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला,क्रीडा,आरोग्य राजकीय क्षेत्रातील विविध समस्या व अडचणींवर हि प्रकाशझोत टाकून वाचा फोडण्याचे काम या पत्रकार संघाच्या वतीने केले जाणार आहे.या इलेक्ट्रॉनिक मिडिया मराठी पत्रकार संघा मध्ये सामिल होणार्‍या सर्व पत्रकार बांधवांना समान न्याय मिळणार असून या नोंदणी कृत संघात समाविष्ट होत असलेल्या सभासद पत्रकारांची संख्या वाढत आहे.तसेच या संघाचे सभासद होण्याची इच्छा असणा~या पत्रकारांनी उपाध्यक्ष समिल जळवी कुडाळ मोबाईल नंबर:-९४२१२३५५०८ सचिव शिरीष नाईक दोडामार्ग मोबाईल नंबर:-९४२११९१०५१,खजिनदार सौ.संजना हळदिवे कणकवली मोबाईल नंबर:-9421563257,सह सचिव श्री.कृष्णा सावंत कुडाळ मोबाईल नंबर:-9421268890 सदस्य श्री.संजय भाईप सावंतवाडी मोबाईल नंबर:-9403313418 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष कृष्णा उर्फ आबा खवणेकर यांनी केले आहे.

इलेक्ट्रॉनिक मिडीया मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्गची कार्यकारिणी पुढील प्रमाणे

1)श्री.कृष्णा उर्फ आबा नारायण खवणेकर जिल्हाध्यक्ष
2)श्री.समिल प्रभाकर जळवी
उपाध्यक्ष
3)श्री. प्रमोद नारायण गवस
उपाध्यक्ष
4)श्री.शिरिष झिलू नाईक
सचिव
5)श्री.कृष्णा गोपाळ सावंत
सह सचिव
6)सौ.संजना संजय हळदिवे
खजिनदार
7)श्री.संजय सहदेव भाईप
सह खजिनदार
8)श्री.प्रसन्न विजय गोंदावळे
सदस्य
9)अॅड.कु.सिध्दिका दत्ताराम भाडये
सदस्य
10)श्री.मिलिंद रामा धुरी
सदस्य
11)श्री.आनंद धनराज कांडरकर
सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page