You are currently viewing निधीखर्च केला नाही असे सांगून आ.केसरकर लोकांची दिशाभूल करतात.;आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकरांची राणेंकडे नाराजी.

निधीखर्च केला नाही असे सांगून आ.केसरकर लोकांची दिशाभूल करतात.;आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकरांची राणेंकडे नाराजी.

सावंतवाडी /-

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक केसरकर सावंतवाडी पालिकेला दिलेला निधी खर्च केला नाही असे सांगत आहेत. त्यांनी निधी दिला त्यावेळी त्यांच्याच पक्षाची सत्ता होती असे असताना सुध्दा ते खोटे बोलत आहेत. अशी नाराजी पालिकेचे आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी आज केद्रीय मंत्र्यांकडे केली.
सावंतवाडी शहरातील डास निमुर्लन आणि स्वच्छतेसाठी भरीव निधी उपलब्ध करुन द्यावा तसेच शहरातून बांदा-संकेश्वर मार्ग जाण्यासाठी प्रयत्न करावा जेणे करुन शहरातील विकासाला त्याचा फायदा होणार आहे अशी ही मागणी त्यांनी केली. श्री.आडीवरेकर म्हणाले की,सत्ताधाऱ्याकडून चांगले काम केले जात आहे मात्र आमदार दीपक केसरकर हे नागरिकांची ,निधी नाही असे सांगून दिशाभूल करत आहेत,असे आरोग्य सभापतीनी सुधीर आडिवरेकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सांगितले.

अभिप्राय द्या..